नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा

2

आदित्य ठाकरे: कणकवली पटवर्धन चौकात शिवसैनिकांतर्फे स्वागत

कणकवली,ता.१४:  जनआशीर्वाद यात्रा ही प्रचाराची नाही. तर प्रत्येक भागातील प्रश्‍न मला समजून घ्यायचे आहेत आणि त्यांची सोडवणूक करायची आहे. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील नवमहाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे अशी ग्वाही युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी येथे दिली.
युवासेनेची जनआशीर्वाद यात्रेचे आज कणकवली पटवर्धन चौकात स्वागत झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कॉर्नर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा महिला संघटक नीलम सावंत-पालव, युवा सेनेचे अ‍ॅड.हर्षद गावडे, गीतेश कडू, राजू राठोड, राजू शेटये, नगरसेवक सुशांत नाईक, माही परुळेकर, मानसी मुंज, शेखर राणे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
आदित्य ठाकरे म्हणाले, प्रत्येक मतदाराचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा आहे. तसेच ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही. ज्यांनी विरोधात काम केलं, त्यांच्यासाठीही जनआशीर्वाद यात्रा आहे. शिवसेनेची कार्यालयं फक्त निवडणुकीपुरतेच नसतात तर सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सदैव सुरू असतात. निवडणुका येतात आणि जातात. पण शिवसेनेचा 80 टक्के समाजकारणाचा वसा सुरूच राहणार आहे.

16

4