मुख्यमंत्र्यांच्या महाजन यात्रेला वेंगुर्ल्यातून जाणार १५०गाड्या…

177
2
Google search engine
Google search engine
Google search engine

णकवलीत सभेचे आयोजन; रॅली काढून करणार शक्तिप्रदर्शन…

वेंगुर्ले ता.१४: महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने कणकवली येथे १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी वेंगुर्ला तालुक्यातील पाच जिल्हापरिषद विभाग व शहर असे सहा विभागनिहाय नियोजन केले असून तालुक्यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश असलेले १५० गाड्या रॅलीद्वारे पाठवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्यदिव्य सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्याच्या अनुषंगाने वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालयात प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी विस्तारक पंकज बुटाला, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपसभापती स्मिता दामले, जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, शहरअध्यक्ष सुषमा प्रभूखानोलकर, महिला तालुकाध्यक्ष मनाली करलकर, ज्येष्ठ नेते बाळा सावंत, नगरसेवक गटनेते सुहास गवंडळकर, नागेश गावडे, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, साक्षी पेडणेकर, शक्तीकेंद्र प्रमुख विजय बागकर, निलेश मांजरेकर, विद्याधर धानजी, संजय परब, संतोष शेटकर, विभागीय अध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, रमेश नार्वेकर, रफिक शेख, सुरेंद्र चव्हाण, वृंदा गवंडळकर आदी उपस्थित होते.
कणकवली येथील या सभेसाठी प्रत्येक बुथनिहाय नियोजन केले असून मच्छिमार, महिला व युवकांनाही स्वतंत्र गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने गावागावात वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांनी या यात्रेत सहभागी होण्यासाठी १५ व १६ रोजी प्रत्येक जिल्हापरिषद विभाग निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

\