तुम्हाला अपेक्षित आमदार निवडून आणणार

2

खासदार विनायक राऊत यांची कणकवलीत ग्वाही

कणकवली, ता.१४: शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत खासदार विनायक राऊत यांनी, कणकवली मतदारसंघात तुम्हाला सर्वांना अपेक्षित असणारा आमदार निवडून आणणार असल्याची ग्वाही दिली. खासदारांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना-भाजपची युती होणार का? तसेच युती झाल्यास शिवसेनेला अपेक्षित असणारा उमेदवार कोण असणार याची चर्चा उपस्थितांमध्ये होते.

जनआशीर्वाद यात्रेच्या प्रारंभी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे शहरातील पटवर्धन चौकात जल्लोषी स्वागत झाले. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यात, मी सर्वांच्या साक्षीचे तुम्हाला शब्द देतो की, कणकवली मतदारसंघात तुम्हा सर्वांना अपेक्षित असणारा आमदार निवडून आणणार असल्याची ग्वाही दिली. या ग्वाहीमुळे कणकवली मतदारसंघात शिवसेनेला अपेक्षित असणारा उमेदवार कोण असणार याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

18

4