Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानिरंजन डावखरे "रेकॉर्ड ब्रेक" मतदानाने निवडून येतील... 

निरंजन डावखरे “रेकॉर्ड ब्रेक” मतदानाने निवडून येतील… 

विशाल परब; सावंतवाडी साधला पदवीधर मतदारांशी संवाद…

सावंतवाडी,ता.२२: कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना सर्व नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते “रेकॉर्ड ब्रेक” मतदानाने निवडून येतील, असा विश्वास भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. डावखरे यांनी आज राजवाडा येथे भाजपाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर मतदार मेळाव्यात संवाद साधला.

यावेळी श्री. परब यांच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावे॓ळी श्री. परब पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपाने दाखवलेला करिश्मा या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसेल आणि श्री. डावखरे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी आमदार राजन तेली, युवराज लखमराजे भोसले, जिल्हा बँक संचालक महेश सारंग मनसे जिल्हा अध्यक्ष अनिल केसरकर, राष्ट्रवादी प्रांतीक सदस्य काका कुडाळकर, पदवीदार निवडणूक संयोजक प्रमोद रावराणे, सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंधावळे, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, भाजपा बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी संयोजक संजू शिरोडकर, रूपा शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments