जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सावंतवाडीतील कळसुलकरच्या विद्यार्थ्यांचे यश…

2

सावंतवाडी ता.१४: क्रिडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत शालेय गटातून कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या ध्रुव गुरुदत्त गवंडळकर व मधुरा मोहन वाडकर यांनी जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावला.दोन्ही विद्याथ्याँची सातारा येथे १८ सप्टेंबरला होणाऱ्या विभागीय जलतरण स्पधेँसाठी निवड झाली आहे.
कळसुलकर शाळेचे दोन्ही विद्यार्थी 17 सप्टेंबरला सातारा येथे रवाना होणार आहेत. या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी संघाचे सचिव अँड. गौतम गव्हाणकर यांनी पुरस्कुत केले आहे.
मधुरा मोहन वाडकर हिने ओरोस येथे शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पधेँत सतरा वषेँ वयोगटातून भाग घेतला होता. ध़ुव गुरूदत्त गवंडळकर याने चौदा वषेँ वयोगटातून भाग घेतला होता. दोन्ही विद्यार्थ्यांनी विक्रमी वेळ साधत जिल्ह्यात आपल्या वयोगटातून प्रथम क्रमांक पटकावला. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने कु.वाडकर व गवंडळकर यांचा माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष द.म.गोठोस्कर, स्टेट बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी प्रफुल्ल सांगोडकर यांच्या हस्ते शनिवारी (14)सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रसाद नावेँकर, संचालक अण्णा म्हापसेकर, ओंकार तुळसुलकर, मुख्याध्यापक एन.पी.मानकर उपस्थित होते. विदयाथ्याँना क्रिडा शिक्षक पी.बी.बागुल, जलतरणपटू दिपक सावंत यांचे मागँदशँन लाभले. संस्थाअध्यक्ष शैलेश पै, खजिनदार मुकूंद वझे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच सातारा दौ-यासाठी शुभेच्छा दिल्या.

12

4