सावंतवाडीतील सह्याद्री फाऊंडेशनच्या वकृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर…

236
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१४:  सह्याद्री फाऊंडेशन व देशभक्त शंकराव गावणकर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.फाउंडेशन हा उपक्रम घेऊन स्थानिक मुलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे.

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ६० मुलांनी सहभाग दर्शविला होता.यात सावंतवाडी,दोडामार्ग,वेंगुर्ले आदी भागातील स्पर्धकांचा समावेश होता.येथील देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेज येथे या स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रात्रीस खेळ चाले मालिकेतील कलाकार उदय पास्ते दयानंद राहूल,देशभक्त शंकराव गावणकर कॉलेजचे सचिव सतीश पाटणकर,प्राचार्य यशोधन गवस,फाऊंडेशनचे सचिव संतोष सावंत,तरुण भारतचे उपसंपादक प्रवीण मांजरेकर,परीक्षक प्रसाद सांगेलकर,साईप्रसाद पंडित,धोंडी वरक,दत्‍ताराम सावंत आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे बक्षीस वितरण फाउंडेशनचे अध्यक्ष संजू परब,सभापती पंकज पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेत मोठ्या गटात इयत्ता नववी-दहावी प्रथम सुहानी नाईक कळसुलकर हायस्कूल,द्वितीय ऋतुजा आनंद मोरे कुणकेरी हायस्कूल,तृतीय सई सच्चिदानंद परब मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी,उत्तेजनार्थ करिष्मा कृष्‍णा परब इन्सुली हायस्कूल,मध्यम गट सहावी ते आठवी हर्षदा संदीप सामं त वेतोरे स्कूल,द्वितीय वैष्णव संतोष सावंत मिलाग्रीस सावंतवाडी,तृतीय प्राची गोविंद सावंत इन्सुली हायस्कूल,उत्तेजनार्थ दीपा साईनाथ वेटे भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी,लहान गटात तिसरी ते पाचवी प्रथम तनवी ज्ञानेश्वर गावकर ओटवणे,द्वितीय ओम अरुण पवार तळकट शाळा नंबर एक,तृतीय काव्या संतोष सावंत मिलग्रीस हायस्कूल,उत्तेजनार्थ श्रीशा सिताराम सावंत बांदा यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

\