तळवडे-न्हावणकोंड धबधब्यावर पर्यटक भिडले, २ गटात जोरदार राडा… 

290
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.२४: तळवडे-न्हावणकोंड येथील धबधब्यावर आज पर्यटकांच्या २ गटात जोरदार हाणामारी झाली. यात दोन्ही गटांनी एकमेकांना माहराण केली. ही घटना आज सायंकाळी घडली. मात्र ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही बाजूने आपापसात तडजोड करण्यात आली. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात काहीच नोंद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे, असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी त्यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे.