पियुषच्या उपचारासाठी १०० इडियट्स कडून आर्थिक मदत…

2

संग्रहालयासाठीची मदतही रोगेंकडून पियुषच्या कुटुंबीयांना सुपूर्द…

मालवण, ता. १४ : येथील १०० इडियट्स ग्रुपने पियुष राजेश जुवाटकर या चार वर्षाच्या मुलाला वैद्यकीय उपचारासाठी पुढाकार घेत आज २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ज्येष्ठ व्यापारी मसऊद मेमन यांच्या हस्ते ही मदत पियुष याच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या १०० इडियट्स ग्रुपने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रुग्णांच्या मदतीसाठी या ग्रुपने आपले मोठे योगदान दिले आहे. आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून ८ लाखाची आर्थिक मदत करण्यात आली आहे. शहरातील गवंडीवाडा येथील चार वर्षाच्या पियुष जुवाटकर या मुलांच्या पायावर शस्त्रक्रियेसाठी आज या ग्रुपच्या माध्यमातून २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ज्येष्ठ व्यापारी मसऊद मेमन यांच्या हस्ते ही मदत जुवाटकर कुटुंबीयांकडे देण्यात आली.
यावेळी मालवणातील शिवमुद्रा संग्रहाकार उदय रोगे यांचा १०० इडियट्स ग्रुपच्यावतीने श्री. मेमन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संग्रहालयासाठी ग्रुपच्यावतीने रोगे यांना २ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीची खरी गरज ही पियुष या मुलाला असल्याचे सांगत श्री. रोगे यांनी ही मदत जुवाटकर कुटुंबीयांना दिली. श्री. रोगे यांच्या या दातृत्वाचे यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी १०० इडियट्स ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

20

4