सावंतवाडी,ता.१५:राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पक्ष निरीक्षक सौ अर्चना घारे परब यांच्या माध्यमातून कलंबिस्त शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले संबंधित विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शालेय गणवेश आला मुकावे लागले होते याबाबतची माहिती शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून सौ घारे यांना देण्यात आली त्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले.
गणवेश मिळाल्यानंतर त्या निरागस चेहऱ्यांवरील आनंद आणि विद्यार्थ्यांचा उत्साह खूप सुखावणारा होता. असे मत सौ घारे यांनी मांडले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.शकर पावसकर, अध्यक्ष श्री.सूनिल धोंडी सावंत, शेडगे सर, सौ.चित्रा बाबर-देसाई , श्रीमती.प्रिया परब, श्री विनायक परब, श्री.रामदास गवस, सौ.मेस्त्री, पालक आणि गावकरी उपस्थित होते.