गणेश जेठे:पेन्शनसाठी आवश्यक असलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी…
सावंतवाडी.ता,१५: नियोजित मुंबई गोवा महामार्गावर कोकणातील पत्रकारांना सरसकट टोल मुक्ती देण्यात यावी.यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडे केली.
दरम्यान पत्रकारांना पेन्शन देताना लावण्यात आलेल्या जाचक अटी दुर करून जास्तीत जास्त पत्रकारांना या योजनांचा लाभ मिळवून दयावा असेही त्यांनी सांगितले.
मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गजानन नाईक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,नगराध्यक्ष बबन साळगावकर,विश्वस्त किरण नाईक,उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर,भोसले नाॅलेज सिटीचे अच्युत भोसले,सतिश लळीत,अण्णा केसरकर,रवी सावंत आदी उपस्थित होते.