मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातील पत्रकारांना टोल मुक्ती दया…

2

गणेश जेठे;पेन्शनसाठी आवश्यक असलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी…

सावंतवाडी.ता,१५:नियोजित मुंबई गोवा महामार्गावर कोकणातील पत्रकारांना सरसकट टोल मुक्ती देण्यात यावी.यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा करण्यात यावा,अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडे केली.दरम्यान पत्रकारांना पेन्शन देताना लावण्यात आलेल्या जाचक अटी दुर करून जास्तीत जास्त पत्रकारांना या योजनांचा लाभ मिळवून दयावा असेही त्यांनी सांगितले.मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गजानन नाईक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,नगराध्यक्ष बबन साळगावकर,विश्वस्त किरण नाईक,उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर,भोसले नाॅलेज सिटीचे अच्युत भोसले,सतिश लळीत,अण्णा केसरकर,रवी सावंत,संतोष वायंगणकर,भगवान लोके,महेश सरनाईक,सुधीर राणे,अशोक करंबळेकर,रमेश जोगळे,उज्वल नारकर,उमेश तोरस्कर,हरिश्चंद्र पवार,संतोष सावंत,प्रफुल्ल देसाई,नंदकिशोर महाजन,एकनाथ पवार,भरत सातोस्कर,सुहास देसाई,निलेश तेंडुलकर,बाळू खडपकर,संदीप गावडे,सोशल मीडियाचे अमोल टेंबकर,विकास गावकर,प्रमोद म्‍हाडगुत,अभिमन्यू लोंढे,अनंत जाधव,अरविंद शिरसाठ,राजाभाऊ खंडाळेकर,उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी,रामचंद्र कुडाळकर,सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय देसाई,उमेश सावंत,समीर कदम,दिव्या वायंगणकर,तानाजी पालव,अर्जुन मोडक,मधुसूदन,नानिवडेकर,सुभाष पंदुरकर,ओंकार तुळसुलकर,बाळासाहेब बोडेकर,हर्षवर्धन धारणकर,माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे सतीश बागवे,सीताराम गावडे,निलेश जोशी,रमेश जोगळे,भरत केसरकर,विजय पालकर,वल्लभ नेवगी,आनंद मर्गज,मोहन जाधव,सावळाराम अणावकर,संजीवनी देसाई,बाळा राणे,निलेश तेंडुलकर,अजय सावंत,भाई देऊलकर,संदेश परब,प्रकाश काळे,रोशन तांबे,शुभम धुरी,रणजित जाधव,शैलेश मयेकर, सिद्धेश पुरलकर, नकुल पार्सेकर, बाळा खडपकर, पंकज मडये,प्रशांत कोठावळे,अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.

27

4