नवाबाग-वेंगुर्ले किनाऱ्यावर मिळाली बंपर मासळी

2

वेंगुर्ले : ता. १५:

वेंगुर्ला नवाबाग येथे रापण मच्छिमारांना रविवारी सकाळी बंपर खडका (धोडकारे) मासळी मिळाली. यामुळे सकाळपासून नवाबाग किनाऱ्यावर मत्स्य खवय्यांनी मासे खरेदीसाठी गर्दी केली होती. या मिळालेल्या मासळीत खडके सहित माणके, लहान इसवन, सुगंट अशी मासळी मिळाली. गणेश चतुर्थी नंतर ही बंपर मासळी मिळाल्याने आणि त्यात आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नवाबाग किनाऱ्यावर मासे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली.

17

4