शेतकऱ्यांप्रमाणे पत्रकारांना राज्य शासनाने झुलवत ठेवले

2

एस एम देशमुख: गजानन नाईक यांचा सावंतवाडीत सत्कार

सावंतवाडी.ता,१५: शेतकऱ्यांप्रमाणे पत्रकारांना केवळ झुलवत ठेवण्याचे काम विद्यमान शासनाने केले असा आरोप मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केला.
पत्रकारांच्या प्रश्नासाठी प्रसंगी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गजानन नाईक यांचा सत्कार श्री देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले सद्यस्थितीत विद्यमान शासनाने केवळ पत्रकारांना झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. पत्रकारांसाठी पेन्शन योजना जाहीर करण्यात आली.त्यासाठी २३० पत्रकार यांची निवड करण्यात आली परंतु अंतिम यादीत फक्त २० पत्रकारांना देण्यात आले. पेन्शन योजना सर्व दिखाऊपणा आहे.त्यामुळे त्या ठिकाणी कोणी पोहोचू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कायदा तसाच पडून आहे.त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे.
केसरकर म्हणाले पत्रकार हल्ला विरोधी कायदा अमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.त्यासाठी आवश्यक असलेले पाठपुरावा करेल याची पत्रकारिता स्वाभिमानी आणि सकारात्मक आहे येथील पत्रकार त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श वारसा पत्रकारांनी जपला.
श्री नाईक सत्काराला उत्तर देताना म्हणाले अत्यंत कठीण परिस्थितीत पत्रकारीता सुरू केली आज मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाल्याने मोठे समाधान आहे या पदाच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम निश्चितच करेन.

12

4