कुडाळ ता.१५:कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या १४ दिव्यांगाना तीन चाकी वाहन मंजूर झाल्याचे पत्र मिळताच दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला.शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनसंवाद आशीर्वाद यात्रेचा चौथा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल ता १४ सप्टेंबरला झाला.या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.विजय संकल्प मेळावा झाला,या मेळाव्यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील १४ दिव्यांगाना तीन चाकी वाहन मंजूर झाल्याचे पत्र आदित्य ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.हे पत्र स्वीकारल्यानंतर या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला.
आमदार वैभव नाईक यांनी आपल्या पाच वर्षांच्या आमदार कारकिर्दीत कुडाळ विधानसभा मतदार संघात विकासात्मक कायापालट केला आहे.सर्वांगीण विकास साधताना श्री नाईक यांनी व्यक्तीगत असे स्तुत्य उपक्रम राबविले आहेत.आरोग्य सामाजिक आदी उपक्रम राबविताना त्यांनी दिव्यागासाठी तीन चाकी वाहन या हाती घेतलेल्या स्तुत्य उपक्रमाबाबत विजय संकल्प मेळाव्यात त्याचे आदित्य ठाकरे यांच्यासह सर्वच नेत्यानी पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई,खासदार विनायक राऊत,पालकमंत्री दीपक केसरकर,संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,प्रदीप बोरकर,विजयराव कदम,जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब,जिल्हा प्रमुख संजय पडते ,सभापती राजन जाधव,श्रेया परब,अतुल बंगे,युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,सुशील चिंदरकर,रुची राऊत, महेश कांदळकर, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव,डॉ सुबोध माधव राजू गवंडे जीवन बांदेकर जान्हवी सावंत कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी पंचायत समिती सदस्य मथुरा राऊळ नगरसेवक सचिन काळप कान्हू शेळके पंकज शिरसाट बबन बोभाटे संजय भोगटे संदेश प्रभू शरयू घाडी स्वाती तेडोलकर कृष्णा धुरी बाळू कुबल गंगाराम सडवेलकर संदीप म्हाडेश्वर नितेश वालावलकर राजू जांभेकर आदी उपस्थित होते
कुडाळ-मालवणातील १४ दिव्यांगांना वाहने मंजूर झाल्याचे पत्र प्रदान…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES