सिंधुदुर्गच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनादेश मिळणारच नाही…

2

काका कुडाळकर;या निवडणुकीत जनता सावध होईल…

कुडाळ ता.१५: सिंधुदुर्गच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात जनादेश मिळणारच नाही,आपलं सरकार या जिल्ह्याच्या विकासाबाबत या जिल्ह्याच्या मुलभुत प्रश्न सोडवण्याबाबत पूर्णपणे अपयशी ठरलेलआहे.त्यामुळे आपल्याला जनादेश का द्यावा असा प्रश्न या जनतेसमोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही,आपण कितीही आटापिटा केला तरी मालवणी जनता भारतीय जनता पार्टीला जनादेश देणार नाही,कारण आज पर्यंत भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून आपण फक्त आश्वासन आणि भूलथापा मारण्यातच आम्हाला भुलवले आहे.आता जनता या निवडणुकीत सावध होईल आणि आपल्याला जनादेशापासून दुर ठेवेल अशी टीका प्रसिद्धी पत्रकातुन काँग्रेसचे प्रांतिक सदस्य काका कुडाळकर यांनी आज येथे केली.
श्री कुडाळकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे,मुख्यमंत्री हे १७ ला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त वेळ भेटी देणारे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडवणीस आहेत.परंतु दुर्दैवाने मात्र त्यानी या जिल्ह्यात भूलथापा पलीकडे काही दिलेलं नाही.या जिल्ह्याला फसविण्याचा एकमेव उद्योग सातत्याने मुख्यमंत्र्यांनी केला आहे.सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री या जिल्ह्याच्या पर्यटन महोत्सवासाठी चार वर्षापूर्वी आले होते त्यावेळी या जिल्ह्याला पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा ठरणाऱ्या सिवर्ल्ड प्रकल्पाबाबत यांनी घोषणा केली होती. तेराशे एकर रोजी ३५० एकर मध्ये हा प्रकल्प शासन लवकरात लवकर राबवेल ठासून सांगितलेलं होतं. परंतु मी सातत्यानं जिल्हा नियोजन च्या सभेत याबाबत विचारणा करून सुद्धा कोणतेही उत्तर पालकमंत्री देऊ शकले नाही. याचा अर्थ आज पर्यंत मुख्यमंत्र्यांनी सीवल्ड बाबत दिलेले आश्वासन ही भूल थाप होती.तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस च्या भूमिपूजन समारंभ हे टर्मिनस लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं तेही आश्वासन आज हवेत विरल आहे.
पाच वर्षे झाली तरी या जिल्ह्याला रेल्वे टर्मिनस सोडा काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळणं कुडाळ कणकवली सावंतवाडी साठी मुश्किल बाब झालेली आहे.त्याचप्रमाणे मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासन लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी होती. त्यांनी सांगितलं की लोकांना योग्य मोबदला मिळेल, मोबदला लवकरात लवकर मिळेल व 19 मध्ये हायवे पूर्णत्वास जाईल. तसेच जिल्ह्यात टोल असणार नाही परंतु आजही कित्येक जमीन धारक पैशासाठी प्रांत कार्यालयाच्या चकरा मारत आहे फक्त कुडाळ तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला म्हणून २०० कोटी रुपये देणं सरकार लागतं परंतु आजही ते द्यावे लागतात म्हणून सरकार याबाबत विनाकारण चालढकलपणा करत आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती पाणी आम्ही विदर्भ मराठवाड्याला देऊ मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो के पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा अन्य महाराष्ट्राच्या भागात जेवढी सिंचनक्षमता आहे तेवढे तरी सिंचनक्षमता या जिल्ह्याची पूर्ण करू शकला का आज या जिल्ह्याची सिंचनक्षमता एक-दोन टक्के च्या पुढे सरकत नाही. तर केंद्राकडून मिळणाऱ्या धरणांसाठी सुद्धा निधी या जिल्ह्याला फार कमी देण्यात यात सरकारने धन्यता मानली. हे जनता विसरू शकत नाही. तर तर जलशिवार योजना ही फक्त अधिकारी आणि ठेकेदारांच्या भल्यासाठी ज्या ठिकाणी राबवली जाते हे वास्तविक पाहता 1991 पासून या जिल्ह्यातील छोटे तलाव व कोल्हापूर टाईप च्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला हे सरकार पैसा देऊ शकलं नाही त्यामुळे शेती बरोबर पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई निर्माण होते. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील काँग्रेस सरकारच्या काळातील महत्त्वाचं मंजूर झालेला प्रकल्प तिलारी धरणातून वेंगुर्ला ते थेट मालवण पर्यंत पाणी देण्याबाबत ची कामगिरी करण्यात हे सरकार गेली पाच वर्ष अपयशी ठरलआहे. या जिल्ह्याला सातत्याने सतावणाऱ्या आकारीपड असेल वन संज्ञा असेल कबुलातदार असेल या प्रश्नाकडे फक्त गेली पाच वर्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी या सरकारने केला कोणतंही ठोस काम केलेलं नाही. कुडाळच्या घोडगे घाटाची आजही लोकांना फसवण्यासाठी फक्त घाटाचं भूमिपूजन केले जात. त्याच्या उद्योगाकडे या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण दुर्लक्ष केला. कुडाळच्या एमआयडीसीची अवस्था फक्त आजारी आणि निवासी एवढीच आहे. तर गोवा राज्याला लागून असलेल्या आडाळी एमआयडीसीची अवस्था गेली पाच वर्ष दयनीय आहे.याठिकाणी कशाप्रकारे व्यवसाय आणावे याबाबत साधे धोरण हे सरकार करू शकले नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा सरकारी नाही तर पक्षाच्या कार्यक्रमासाठी येतात यात्रेसाठी येतात जनादेश यात्रा म्हणून येतात परंतु मी सांगू इच्छितो मालवणी माणसा आदरतिथ्य करतो त्यामुळे आतापर्यंत तुम्ही जसे आलात उत्तम मालवणी पाहुणचार घेतला तसाच यावेळी घ्या आपल्याला काही जनादेश मिळणार नाही असे म्हटले आहे.

13

4