कुडाळ-मालवण प्रांताधिकारी म्हणून वंदना खरमाळे यांची नियुक्ती.

2

कुडाळ ता.१५: कुुडाळ-मालवण प्रांताधिकारी म्हणून नाशिक विभागात तहसीलदार म्हणून काम केलेल्या श्रीमती वंदना खरमाळे यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली,असून सोमवार १६ सप्टेंबर रोजी त्या प्रांताधिकारी पदाचा पदभार स्विकारणार आहेत.

कुडाळ व मालवण तालुक्यासाठी सध्या डॉ. विकास सूर्यवंशी हे प्रांताधिकारी म्हणून काम पाहत होते.त्यांची बदली रत्नागिरी येथे प्रांताधिकारी म्हणून झाली.कुडाळ- मालवण प्रांताधिकारी म्हणून श्रीमती वंदना खरमाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्या नाशिक विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.त्यांची ही बदली पदोन्नतीने प्रांताधिकारी म्हणून झाली आहे.सोमवार १६ सप्टेंबरला ते आपल्या पदाचा पदभार करणार आहे.

15

4