देवगड येथील पूरग्रस्त समितीची तिलारी पूरग्रस्तांना मदत…

2

दोडामार्ग.ता,१५: तिलारी येथे झालेल्या पूरपरिस्थिती नुकसान झालेल्या लोकांना देवगड येथील पूरग्रस्त संकलन समितीच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली.

तालुक्यातील कोनाळ, घोटगे, येळपळवाडी या गावांना तिलारी नदीला आलेल्या पुराचा फटका बसला होता त्यात परिसरातील घरांचे नुकसान झाले होते.अठरा कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले होते.यात कोनाळ येथील रत्नकांत कर्पे, गोकुळदास कर्पे, सुनील च्यारी, बाबुराव लोंढे, यशवंत सावंत, श्रीमती आशालता .लोंढे,श्रीमती प्रभावती लोंढे , बाबलो हरीजन व वसाहतीतील कुंटूबांना मदत देण्यात आली.
यावेळी पूरग्रस्त संकलित समिती चे कार्याध्यक्ष.धोंडू ताम्हणकर , सुधीर मांजरेकर , दतात्रय बलवान रवि चानदोसकर , अनिल खडपकर , संतोष गुडेकर , नंदू परब, तुषार भाबल , जि .प .सद्श्य तथा जनसेवा प्रतिस्थानचे अध्यक्ष राजन म्हापसेकर कोनाळ ग्रा प .सढ्श्य महेश लोंढे घोट्गे वायगणतंड उप सरपंच प्रथमेश सावंत भाजप बुध प्रमुख दिनेश लोंढे व अन्य जण उपस्थित होते.

6

4