सोनाळी अभिनव इंग्लिश मीडियमच्या संस्थापिका स्मिता तावडे यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

2

वैभववाडी.ता,१५: कुंभजाई एज्युकेशन सोसायटी संचलित सोनाळी अभिनव इंग्लिश मिडीयमच्या संस्थापिका स्मिता रवींद्र तावडे वय ५५ वर्षे यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कै. स्मिता तावडे यांचे मुळगाव कुंभवडे हे आहे. पती कै. रवींद्र तावडे यांच्या निधनानंतर गेली नऊ वर्ष सोनाळी, तरेळे व फोंडाघाट येथील इंग्लिश मीडियमची संपूर्ण जबाबदारी त्या सांभाळत होत्या. चार दिवसांपूर्वी त्यांना मुंबई वसई येथे हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुली, जावई, व नातवंडे असा परिवार आहे.

फोटो – स्मिता तावडे.

21

4