वेंगुर्ले ता.१५:
वेंगुर्ला तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या झालेल्या त्रैमासिक बैठकीत विविध संजय गांधी योजनेची २३, श्रावणबाळ योजनेची १० तर इंदिरा गांधी योजनेची ३ मिळून एकूण ३६ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची त्रैमासिक बैठक राजन गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, सुरेश भोसले, उमेश येरम, एन.एस.मयेकर, गटविकस अधिकारी व मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संजय गांधी निराधार अनुदान योजना मंजूर झालेल्यांमध्ये जयश्री म्हापणकर (आडेली), माधुरी गावडे, रामदास परब, कानू पालकर, संतोष परब (पाल), करीश्मा परब (पेंडूर), एकादशी तारी, शारदा गडेकर, लुसी फर्नांडीस, शितल काणेकर (वेंगुर्ला), सुनिल कांबळी, गीता मोघे (उभादांडा), रुपाली डिचोलकर (दाभोली), मयुर मालंडकर (निवती), प्रणाली माडये, कृष्णा पवार (चिपी), दूर्वा कनयाळकर (रेडी), संगीता माडये (परुळे), प्रणोती झांटये (मठ), मेनका राऊत (शिरोडा), रोहिणी सावंत (कुशेवाडा), कृपाली सावंत (खानोली), साधना म्हापणकर (म्हापण) यांचा, श्रावणबाळ योजना मंजूर झालेल्यांमध्ये जर्नादन गिरप, अल्का अणसूरकर, आनंद जाधव, विजय पालयेकर (वेंगुर्ला), लक्ष्मी मराठे (तुळस), वंदना करंगुटकर (दाभोली), कुसुम गोडकर (परुळे), बाबल शेटये (शिरोडा), गोविद सावंत (वेतोरे), भाग्यश्री कुर्ले (उभादांडा) यांचा तर इंदिरा गांधी योजनेमध्ये गणपती पाटील (न्हैचिआड), चंद्रकांत केरकर (परुळे), एकनाथ केरकर (कोचरा) आदींचा समावेश आहे.