दीपक केसरकर; आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.आता त्यांनी जिल्ह्यात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे,असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित गुरुसेवा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान केले.ना.दिपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारा यावर्षीचा वसंतशेठ केसरकर आदर्श शिक्षक पुरस्कार माध्यमिक शाळेचे शिक्षक दीपक तारी यांना श्री.केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोज परब,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी,भरत गावडे,लीलाधर घाडी,अभिनेत्री प्रतिभा चव्हाण आदी उपस्थित होते.श्री.केसरकर पुढे म्हणाले,लहान मुले आईच्या कुशीत वाढतात,आणि जस-जशी ती मोठी होतात त्यानंतरची आईची माया त्यांना त्यांचे शिक्षक देत असतात.त्यामुळे अशा शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना नेहमीच आत्मीयता राहिली आहे.याठिकाणी कोणतेही कोचिंग क्लासेस उपलब्ध नसताना प्रशालेत मिळणारे शिक्षण घेऊन आज पर्यंत खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांनी आपले उज्वल यश संपादन करून जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.याचे सर्व श्रेय हे त्यांच्या शिक्षकांना जाते.
ते पुढे म्हणाले,कै.वसंत केसरकर यांनी नेहमीच शिक्षणाला या ठिकाणी प्रोत्साहन दिले होते.सावंतवाडीत ज्ञानाची गंगा आणण्यासाठी त्यांचे सुद्धा मोलाचे योगदान होते.त्यामुळे त्यांची शिक्षणाबद्दलची असलेली आत्मीयता अबाधित ठेवण्यासाठी या पुरस्कराची संकल्पना आम्ही अस्तित्वात आणली,असेही श्री.केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील निवडक शिक्षकांना सुद्धा श्री.केसरकर यांच्या हस्ते विशेष सन्मान पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यात विशेष सन्मान पुरस्कार – विश्वनाथ वामन सावंत (दोडामार्ग-माध्यमिक),कर्पूरगौर शशिकांत जाधव (वेंगुर्ले-प्राथमिक),शंकर वा.पवार (केंद्रप्रमुख माडखोल) दत्ताराम सा सावंत (विज्ञान शिक्षक धुरीवाडी-धवडकी,माडखोल) विजय रो चौकेकर (साने- गुरुजी कथामाला,मालवण) योगिता यशवंत गावडे (निवृत्त) धनदा सत्यजित देशमुख (लक्ष्मीनारायण विद्यालय,बिबवणे) आदींना देण्यात आला.तर आदर्श शिक्षक पुरस्कार – रामकृष्ण वासुदेव गवस (जिल्हा परिषद तळेखोल शाळा नंबर १,दोडामार्ग),अजय शांताराम सावंत (सोनावला हायस्कूल सोनावल,सावंतवाडी), विलास महादेव आंबोलकर ( जिल्हा परिषद कारीवडे नंबर १,सावंतवाडी ),मेघना प्रकाश राऊळ (मिलग्रीस हायस्कूल सावंतवाडी),चंद्रकांत तुकाराम सावंत (जिल्हा परिषद मठ शाळा नंबर २,वेंगुर्ले),जानवी गिरीधर पडते (एस.एस.देसाई विद्यालय पाठ,वेंगुर्ले),सिताराम गजानन म्हाडगुत (जिल्हा परिषद शाळा हळदीचे नेरूळ नंबर.१, कुडाळ),अनिल गोवेकर (मांडकुली हायस्कूल मांडकुली,कुडाळ),सेजल संतोष परब,(केंद्र शाळा वडाचा पाट मालवण) ,संध्या शिवराम तांबे (वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा,मालवण),आनंद लक्ष्मण करपे (आश्रम शाळा बोर्डवे,कणकवली),वृषाली विठ्ठल जाधव (विद्या मंदिर हायस्कूल कणकवली),रघुनाथ धुळजी बोडेकर (जिल्हा परिषद शाळा वे वेलवाडी जामसंडे देवगड),रामदास तुकाराम कोयंडे (मोंड हायस्कूल मोंड देवगड) श्वेता शिवप्रसाद देसाई (जिल्हा परिषद शाळा कुणकेरी नंबर ३ सावंतवाडी) आदींना देऊन गौरविण्यात आले..यावेळी जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.