वेंगुर्ले-आसोली हायस्कूलमध्ये “हिंदी भाषा दिन”उत्साहात…

2

वेंगुर्ले ता.१५: तालुक्यातील आसोली हायस्कूल आसोली येथे हिंदी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या हिंदी कथाकथन स्पर्धेत महादेव रागोबा धुरी याने प्रथम क्रमांक पटकाविला.शिवराम नंदकुमार घाडी-द्वितीय,प्रणिता भानुदास पाटणेकर-तृतीय तर मानसी लक्ष्मण धुरी व साक्षी सुखा धुरी यांना उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका तथा हिंदी अध्यापिका विशाखा वेंगुरलेकर बोलताना म्हणाल्या,हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे,त्यामुळे या भाषे बद्दल निष्ठा ठेवून विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.त्यासाठी विद्यार्थ्यांनी हिंदी साहित्य वाचन वाढवले पाहिजे असे सांगितले.यावेळी प्रशालेचे शिक्षक विष्णु रेडकर,लक्ष्मण शिरोडकर,भावना आवळे,चंद्रकांत बर्डे,आदींसह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

9

4