रणजित देसाई यांचा इशारा: उद्या सकाळी होणार अनोखे आंदोलन…
कुडाळ.ता,१५: जिल्ह्यातील रस्त्यांबाबत पालकमंत्री खासदार व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी नेरूरपार ब्रीज ते वसुंधरा विज्ञान केंद्र असा बैलगाडीने प्रवास करण्याचा इशारा आज येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिला आहे.
उद्या सकाळी नऊ वाजता हे अनोखे आंदोलन सुरू होणार असून त्या नंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक अपघात होत आहेत. प्रशासनाचे व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष नाही. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. असे श्री देसाई यांनी सांगितले.