आंबोली घाटात दुधाचा टँकर पलटी…

2

जीवितहानी नाही; हजारो रुपयाचे दूध रस्त्यावर…

आंबोली ता.१५: घाटात दुधाचा टँकर कोसळल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे.हा प्रकार आज रात्री आठच्या सुमारास घडला.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र टँकर पलटी झाल्यामुळे हजारो रुपयांचे दुध रस्त्यावर ओतले आहे.
संबंधित टँकर डेलिशिया फूड या कंपनीचा आहे.तो बेळगाव ते गोवा असा प्रवास करत होता.चालकाला धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटला व हा अपघात घडला.

8

4