2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
स.का.पाटील महाविद्यालयाचे यश: निर्वासित एकांकिकेला सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक…
मालवण.ता,१५: मुंबई विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवात मालवणच्या स.का पाटील महाविद्यालयाच्या “निर्वासित”या एकांकीकेने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले आहे.या यमहोत्सवात एकांकीका विजेते पदासह पुरुष व स्त्री अभिनयातही प्रथम क्रमांक पटकाविला आहे.मालवण कॉलेजच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
या एकांकिकेचे लेखन स्वप्नील जाधव, दिग्दर्शन गणेश गावकर ,नेपथ्य देवेन कोंळबकर, संगीत पंकज गावडे यांनी दिले आहे तर यात वैभव वळंजू प्रथमेश सामंत ललित चव्हाण लहान जानवी बीरमोळे, स्नेहा चव्हाण, विजय पेडणेकर, भूषण माने आदी कलाकार सहभागी झाले आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4