वेंगुर्ले शहरांमधील पूरग्रस्त लोकांना धनादेश वाटप..

2

पालकमंत्री दीपक केसरकर व त्यांच्या स्नेह परिवाराच्यावतीने पूरग्रस्त लोकांना आर्थिक मदत.

वेंगुर्ले : ता.१५: पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या स्नेह परिवारातील श्री दिलीप लाखे ट्रस्ट, श्री विकास वालावलकर व अन्य मित्र परिवार यांच्यावतीने वेंगुर्ले शहरांमधील पूरग्रस्त लोकांना धनादेश वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी एकूण ३२ धनादेश वेंगुर्ला शिवसेना कार्यालय येथे वाटप करण्यात आले. यावेळी कोंकण म्हाडा सदस्य सचिन वालावलकर यांच्या पुढाकाराने धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख विवेकानंद आरोलकर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश भोसले, शिवसेना महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर, नगरसेविका सुमन निकम, वृंदा मोर्डेकर, युवासेना शहर प्रमुख शेखर कानेकर, नितिष कुडतरकर, कुबल, दिलीप राणे, डेलिन डिसोजा आदि शिवसैनिक उपस्थित होते.

13

4