पोलिसात गुन्हा दाखल,चोरटे कर्नाटकातील असल्याचा संशय…
कुडाळ/मृणाल सावंत ता.१५: कणकवली येथील चालकाला कर्नाटक मधील अज्ञात तिघांकडून बेदम मारहाण करत लुटल्याचा प्रकार घडला आहे.ही घटना काल रात्री घडली.रुपेश आनंद अडुळकर असे त्या चालकाचे नाव आहे.त्यांच्याकडून रोख रक्कम ४००० रुपये,मोबाईल व सुमो गाडी घेऊन संबंधित चोरट्यांनी पलायन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की ,कणकवली येथील चालक रुपेश अडुळकर हे पत्रादेवी येथून कणकवलीच्या दिशेने जात होते.यावेळी अनोखळी तीन युवक कसाल कडे जाण्याच्या बहाण्याने या गाडीमध्ये बसले त्यांच्या बोलण्यावरून चालकाला त्यांचा संशय आल्याने त्यांना बांदा येथे उतरण्यास सांगितले.मात्र त्यांनी नकार देत या ठिकाणी आम्ही नवखे आहोत आता आम्हाला जायला गाडी नसल्याने आपण कसालला सोडा आता रात्री आम्ही कुठे जाणार अशी या तिघांनी केलेली विनवणी चालकाला महाग पडली चालकाने त्यांची विनवणी मान्य करत गाडी कणकवलीच्या दिशेने मार्गस्थ केली बाद्यापासून कुडाळ तालुक्यात वेतळबाबर्डे येथे गाडी गेल्यावर एकाने आपल्याला उलटी होत असून गाडीत उलटी झाली तर घाण होईल असे सांगत गाडी चालकाला गाडी थांबवायला सांगितली यावेळी रस्त्यावर वर्दळ नव्हती यावेळी चालकाने गाडी थांबवताच दोघांनी चालकाला पकडुन बेदम मारहाण केली चालकाकडील रोख रक्कम हिसकावून घेत गाडीतून त्याला काढले यानंतर त्या तिघांनी सुमो गाडीसह दाणोली आबोलीच्या दिशेने पलायन केले संशयितांच्या बोली भाषेवरून ते कर्नाटक मधील असल्याची माहिती सुमो चालकाने कुडाळ पोलिसाना दिल्यानंतर लुटमारी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलीस निरीक्षक शंकर कोरे याच्याशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयितांचा तपास सुरू असल्याचे सांगितले
बॉक्स वेताळबाबर्डेतुन गाडी दाणोलीकडे वळवली
संशयित तिघांनी कुडाळ तालुक्यातील वेताळबाबर्डे येथे चालकाला मारहाण करून त्याला दाणोली आंबोलीच्या दिशेने नेत असताना चालकाला दाणोली येथे सोडून मारहाण करून संशयित आंबोलीच्या गाडीसह फरारी झाले.
याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात अपहरण व मारहाण करून चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.