‘वस्त्रहरण’ फेम सचिन मयेकर यांचे निधन…

2

 

मालवण, ता. १५ : शहरातील सोमवार पेठ येथील रहिवासी ‘वस्त्रहरण’ फेम आणि उत्कृष्ट बास्केटबॉलपटू सचिन अंकुश मयेकर (वय-४५) यांचे आज रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या गाजलेल्या ‘वस्त्रहरण’ या नाटकात सचिन मयेकर यांनी अर्जुन, धर्म, दुःशासन यासह अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. भद्रकाली प्रॉडक्शनचे व्यवस्थापक तसेच नेपथ्यकार म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले होते. शालेय जीवनात ते उत्कृष्ट बास्केटबॉलपटू म्हणून ओळखले जात. गेली काही वर्षे ते मालवण या मूळ गावी वास्तव्यास होते. आज रात्री अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे आई, भाऊ, बहिणी, वहिनी, पुतणी असा परिवार आहे. उद्या दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

0

4