Wednesday, July 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकुडाळ शाखेच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र कदम यांची निवड...

कुडाळ शाखेच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र कदम यांची निवड…

भारतीय बौद्ध महासभा ; सरचिटणीसपदी भिकाजी कदम…

कुडाळ, ता. १६ : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कुडाळच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र कदम तर सरचिटणीसपदी भिकाजी कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सन २०१९ ते २०२१ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा कुडाळ शाखेची मासिक सभा कुडाळ येथील अनंत मुक्ताई सभागृहात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष भगवान कदम यांनी भूषविले. सभेत पं. ध. माणगावकर, आर. डी. बांबर्डेकर, व्ही. डी. जाधव, भाई बावकर, र. वि. जाधव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
सभेत सन २०१८-१९ वर्षाचा आर्थिक अहवाल मंजूर करण्यात आला. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचेही नियोजन करण्यात आले. त्यानंतर २०१९ ते २०२१ या कार्यकालासाठी तालुक्याची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस दीपक अणावकर यांनी केले.
नूतन कार्यकारिणी अशी- अध्यक्ष – हरिश्चंद्र कदम, सरचिटणीस – भिकाजी कदम, कोषाध्यक्ष – दीपक अणावकर, हिशेब तपासणीस – धनंजय कदम, कार्यालयीन सचिव – प्रसाद जाधव. संस्कार विभाग उपाध्यक्ष – भगवान कदम, सचिव – रवींद्र जाधव, निलेश जाधव, प्रचार/प्रसार विभाग उपाध्यक्ष – प्रवीण कदम, सचिव – विनोद जाधव, विजयकुमार जाधव, महिला विभाग उपाध्यक्ष – अंकिता कदम, सचिव सुनीता कदम, स्मिता नाईक, संरक्षण विभाग उपाध्यक्ष – सिताराम सोनवडेकर, सचिव – महेश तेंडोलकर, सुभाष पणदूरकर, संघटक – शरद नाईक, हेमंत कदम, सूर्यकांत बिबवणेकर, विष्णू अणावकर.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments