दिवसाकाठी चारशेहुन अधिक रुग्ण:चांगली वैदयकीय सेवा मिळत असल्याचा प्रशासनाचा दावा…
सावंतवाडी.ता,१६: येथील कुटीर रुग्णालयात आज मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी पाहायला मिळाली.चतुर्थी सणाला आणि नियमित रुग्णांचा यात समावेश होता. गेले चार ते पाच दिवस दिवसाकाठी चारशेहून अधिक रुग्ण रुग्णालयात येत आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दुसरीकडे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल होण्याच्या मार्गावर असताना सावंतवाडीसह वेेंगुला आणी दोडामार्ग आदी भागातील लोक आता कुटीर रुग्णालयात येत असल्यामुळे ही गर्दी आहे. तसेच येथे येणा-या रूग्णांना सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे मत वैदयकीय अधिक्षक उत्तम पाटील यांनी मांडले.
चतुर्थी संपल्यानंतर गेले काही दिवस रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता गेली चार ते पाच दिवस दिवसाकाठी ४०० साडेचारशेहून अधिक रुग्ण याठिकाणी उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.याला श्री.पाटील यांनी दुजोरा दिला.याठिकाणी
डॉ.ज्ञानेश्वर दूर्भाटकर,अभिजीत चितारी, सागर जाधव,वजराटकर यांच्या सारखे चांगले डॉक्टर असल्यामुळे हा गर्दीचा आकडा वाढत आहे. असे यावेळी सांगण्यात आले.