समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

2

लक्ष्मण रावराणे; आदर्श शिक्षक प्रशांत रासम यांचा सत्कार

वैभववाडी.ता,१६: समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समाजात सलोखा निर्माण करण्याचे काम देखील ते करीत असतात. असे प्रतिपादन सभापती लक्ष्मण रावराणे यांनी व्यक्त केले.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रशांत रासम यांचा खांबाळे ग्रामस्थांच्यावतीने सभापती श्री,रावराणे यांनी चांदीची गणेशमुर्ती,शाल व श्रीफळ देवुन सत्कार केला.यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके,माजी सभापती शुंभागी पवार,सरपंच संचिता गुरव,उपसरपंच लहु सांळुखे,केंद्रप्रमुख शिवाजी पवार,मुख्याध्यापक संजय रासम,गणपती पाटील,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती श्री.रावराणे म्हणाले, समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भुमिका अतिशय महत्वाची असते. समाजात सलेाखा निर्माण करण्याचे काम देखील ते करीत असतात. अशा आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याची संधी मिळाल्याचा आपल्याला आनंद आहे.
पंचायत समिती सदस्य श्री.लोके म्हणाले, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविण्यासाठी विविध पातळ्यावर खटाटोप सुरू असतात.परंतु खऱ्या अर्थाने एका आदर्श शिक्षकालाच पुरस्कार मिळाला असुन ते पुरस्कारापेक्षा कित्येक पटीने त्यांचे काम चांगले आहे.त्यांनी केलेले काम हे इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरणारे आहे.कार्यक्रमाला प्रवीण गायकवाड,गुरूनाथ गुरव,सत्यवान सुतार,राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात माजी सभापती शुंभागी पवार,संजय रासम,उत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका सौ. सुतार यांनी तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री.पवार यांनी केले.

फोटो- आदर्श शिक्षक प्रशांत रासम यांचा सत्कार सभापती लक्ष्मण रावराणे यांनी केला.यावेळी मंगेश लोके,शुंभागी पवार,संचिता गुरव,लहु साळुंखे आदी उपस्थित होते.

36

4