माडखोल व्हि. पी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील इनक्युब फार्मा कंपनीत निवड…

351
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०८: व्हि.पी.कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलच्या बी.फार्म, डी. फार्म या अंतिम वर्षाच्या १५ विद्यार्थ्यांची मॅन्युफॅक्चरींग, प्रोडक्शन व पॅकेजिंग डिपार्टमेंट साठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत गोवा राज्यातील इनक्युब इथिकल्स प्रा.लि या फार्मा कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.सुनील शिंगाडे ,प्लेसमेंट ऑफिसर व एचऒडी डॉ.संदेश सोमनाचे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांनी संस्थेचे माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ.राहुल पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.