Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सतत पडणाऱ्या पावसामुळे भात शेती धोक्यात; शेतकरी चिंताग्रस्त
वैभववाडी/पंकज मोरे.ता,१६: वैभववाडी तालुक्यात दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत कोसळणा-या पावसामुळे भात शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी पावसाने सलग मुक्काम केल्याने कोकणातील बळीराजा हवालदिल झाला आहे. हाता तोंडाशी आलेले भात पीक मुसळधार पडणाऱ्या पावसाने पुरतं आडव झालं आहे. सलग दोन दिवस पाऊस पडत असल्याने शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.