जिल्ह्यात स्वच्छ्ता ही सेवा अंतर्गत विविध उपक्रम प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनसाठी प्राधान्य

2

सहभाग घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी.ता,१६: संपूर्ण भारत देशात महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्ताने २ ऑक्टोबर २०१९ रोजी हागणदारीमुक्तीची घोषणा होण्याकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन ग्रामिण या कार्यक्रमाचे लक्ष्य आता निर्माण झालेल्या स्वच्छता सुविधांच्या शाश्वततेकडे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाकडे असून आंतरराष्ट्रीय स्वच्छतेच्या व्याप्तीसोबत मेळ घालणे आणि गावांची एकूणच स्वच्छता निश्चित करणे हे असणार आहे.
यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये मा. पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला आवाहन करताना प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर भर देण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या म्हणजेच २०१९ च्या “स्वच्छता ही सेवा” ची प्रमुख संकल्पना प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन ही असणार आहे. “स्वच्छता ही सेवा” चा कालावधी दिनांक ११ सप्टेंबर २०१९ ते दि.०२ऑक्टॊबर २०१९ पर्यंत असेल. प्लास्टिक कचरा गोळा करण्यांसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती आणि समुदाय संघटन करण्यांत येणार आहे. त्यानंतर दिनांक ३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत परिणामकारकरित्या या प्लास्टिकचे पुनर्चक्रीकरण करण्यांत येणार आहे.
२ टप्प्यामध्ये हे अभियान राबविणेत येणार आहे. यात प्लास्टिक कचरा गोळा करण्यांसाठी महाश्रमदान २ आक्टोबर २०१९ संपूर्ण अभियान कालावधीमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या विषयावर जनजागृती घडवून आणण्यासाठी उपक्रम हाती घेणेत येणार आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीनी श्रमदानातून प्लास्टिक गोळा करण्याचे तत्व जोपासले जावे. ग्रामपंचायत स्तरावर विशेषत: २ ऑक्टोबरच्या दिवशी महाश्रमदान घेण्यांत येणार आहे. जमा झालेल्या प्लॅस्टिकच्या व्यवस्थापनासाठी इंधन म्हणून किंवा इतर उपयोग करणाऱ्या उदयोग समुहांना सहभागी करुन घ्यायचे आहे.
या अभियानाचे खालीलप्रमाणे महत्त्वाचे घटक असतील. पुर्व तयारी आणि जनजागृती (११ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०१९): संपूर्ण देशात आणि राज्यात स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहून व्यापक जनजागृती करण्यासाठी सामाजिक आणि राजकिय कार्यकर्ते, विश्वासू सामाजिक संघटना, उदयोजक, शैक्षणिक संस्था, सैन्य दले आणि केंद्रिय पोलिस दले, दवाखाने, शेतकऱ्यांच्या संघटना आणि पंचायती राज संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा. मोठया प्रमाणात जमा होणारे प्लास्टिक योग्य व्यवस्थापनासाठी जमा करण्याच्या केंद्रापासून वाहून नेण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करणेचे नियोजन करणेचे आहे.
देशभर शपथ आणि श्रमदान (दि.२ ऑक्टोबर, स्वच्छ भारत दिवस) – या दिवशी राष्ट्रीय शपथ घेवून प्लास्टिक कचरा गोळा करण्याची बाब सर्व शहरांमध्ये व गावांमध्ये राबविण्यांत येणार आहे. गावागावात जमा झालेला प्लॅस्टिक कचरा तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरातील संकलन केंद्रांच्या ठिकाणी पोहोचण्याचे नियोजन करणेत येणार आहे. कार्यक्षम विल्हेवाट (३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर)- या मोहिमेत जिल्हाभरात जमा झालेल्या सर्व प्लॅस्टिक कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट करावयाची आहे. प्लास्टिक कचऱ्याचे संकलन आणि वाहतुक करण्यासाठी खाजगी उदयोजकांची मदत घेणेची आहे. कसल्याही परिस्थितीत जमा झालेला कचरा पर्यावरणात परत जाणार नाही किंवा डंपिग ग्राउंडमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे. सर्व ग्राम पंचायती यांनी या अभियानांतर्गत सर्व प्रकारचा प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यासाठी उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी तयार रहावे. यामध्ये त्या त्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

6

4