आ. नितेश राणे; लोरे गोसावीवाडी येथे समाज मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न
वैभववाडी; ता,१६: खा. नारायण राणे यांनी समाजकारण व राजकारण करताना कुठल्याही समाजावर अन्याय होवू दिला नाही. यापुढेही प्रत्येक समाजाच्या मागण्या पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी व्यक्त केले.
लोरे नं. २ गोसावीवाडी येथे आ. नितेश राणे यांच्या आमदार फंडातून समाज मंदिर उभारण्यात आले आहे. याचा उदघाटन सोहळा आ. नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर वैभववाडी स्वाभिमान अध्यक्ष अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, दिलीप रावराणे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, सरपंच महेंद्र रावराणे, नाना रावराणे, छोटू रावराणे, प्रमोद पांचाळ, प्रकाश पाटील, विठू गोसावी, बापू गोसावी, लक्ष्मण गोसावी, पांडुरंग गोसावी, हरिश्चंद्र गोसावी, महेंद्र गोसावी, कृष्णा गोसावी, तानाजी गोसावी, रमेश गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. राणे म्हणाले, निवडणूक जवळ आली आहे. आता असंख्य चेहरे गावात दिसतील, खोटी आश्वासने देतील, अशा विरोधकांना पाच वर्ष कुठे होता? असा जाब मतदारांनी विचारला पाहिजे. लोरे गावातील समाज मंदिर बांधून देण्याचे आश्वासन एका माजी आमदाराने दिला होता. मात्र त्यांनी शब्द पाळला नाही. परंतु या समाजमंदिर कामाबाबत माहिती मिळताच सदर काम आम्ही तात्काळ हाती घेतले. आणि काम पुर्णही केले. गावात विधायक कार्यासाठी हक्काच समाज मंदिर उभ राहील आहे. त्याचा चांगला फायदा ग्रामस्थांनी करुन घेतला पाहिजे असे सांगितले. गोसावी समाजाच्या वतीने आ. नितेश राणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- गोसावीवाडी येथे समाज मंदिराचे उदघाटन करताना आ. नितेश राणे. सोबत अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे व इतर.