जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत पसरले दुर्गंधीचे साम्राज्य

2

पंधरा दिवस स्वच्छ्ताच झाली नाही;जिल्हाधिकारी लक्ष देतील का ?

सिंधुदुर्गनगरी /प्रतिनीधी
जिल्हाधिकारी कार्यातील स्वच्छ्ता करणारे कर्मचारी 1 सप्टेंबर पासून कार्यालयात फिरकले नसल्याने सध्या जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. गेले १५ दिवस स्वच्छता झाली नसल्याने इमरतीमधील स्वच्छ्ता गृहात अस्वच्छ्ता पसरली आहे. स्वच्छतेत आघाडीवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अस्वच्छतेचे माहेर घर बनल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच जिल्हाधिकारी याकडे वेळीच लक्ष देतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या इमारतीमधील विविध विभागांसह शौचालयांची स्वच्छता ठेकेदारामार्फत केली जाते. मात्र, संबंधीत ठेकेदारांकडून १ सप्टेंबर पासून या इमारतीतील स्वच्छतेचे काम बंद करण्यात आले आहे. पंधरा दिवस स्वच्छतेचे काम बंद असूनही जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे या इमारतीमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे . तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग पडले आहेत.

स्वच्छतेत राज्यात आघाडीवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. येथील शौचालयामध्ये अस्वच्छतेमुळे जाणेही मुश्किल बनले आहे. असेच आणखी काही दिवस स्वच्छतेचे काम बंद राहिल्यास कर्मचाऱ्यांना कार्यालयात काम करणेही मुश्किल होणार आहे . तरी याबाबत जिल्हा प्रशासन अद्मापही सुशेगाद आहे. अशीच परिस्थिती अजुन कायम राहिल्यास साथरोगांना निमंत्रण मिळू शकेल. याबाबत कर्मचाऱ्यांसह अभ्यांगतामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .

4

4