तुळस येथे कोल्हयाच्या कळपांचा तिघांवर हल्ला…

2

किरकोळ जखमी:ग्रामस्थांत भितीचे वातावरण,बंदोबस्त करण्याची मागणी…

वेंगुर्ले ता.१६: तालुक्यातील तुळस-पलतवाडीत तीन जणांचा कोल्ह्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरात सध्या भितीचे वातावरण आहे.जखमींवर तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.तुळस गावात सध्या सुमारे ७ ते ८ कोल्ह्यांचा कळप दिवसाढवळ्या फिरताना नजरेस पडत आहेत.या कोल्ह्यांनी काही जणांच्या घरातही शिरण्याचा प्रयत्न केला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ७ पैकी २ कोल्हे हे पांढऱ्या शुभ्र रंगाचे असून ते अचानक माणसांच्या अंगावर चाल करुन येतात व चावा घेतात.रविवार सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नाईक वाडीतील एकनाथ रामचंद्र नाईक व आरोसकरवाडीतील शांताराम अनंत आरोसकर आणि आज सोमवारी सकाळी रजनी कृष्णा राय यांच्या पायाचा चावा घेऊन या कोल्ह्याने त्यांना जखमी केले.
या जखमींवर नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. तुळस-पलतडवाडी येथील प्राथमिक शाळेच्या परिसरात कोल्ह्यांचा वावर असल्याने मुलांना शाळेत पाठवायचे किवा नाही अशी भिती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. वनविभागाने सदर कोल्ह्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

6

4