आडेलीतील विविध विकास कामांची सभापतींच्या हस्ते भूमिपूजने…

204
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.१६: तालुक्यातील आडेली गावातील विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम वेंगुर्ला पंचायत समिती सभापती सुनिल मोरजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.आडेली येथील या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक,आडेली ग्रा.प.उपसरपंचा प्राजक्ता मुंडये, सचिन गडेकर, माजी सरपंच प्रकाश गडेकर, भारत धर्णे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गडेकर, नितीन मांजरेकर, पुरुषोत्तम धर्णे, तुषार कांबळी, प्रशांत मुंडये, ग्रा.प.सदस्य संतोष कासले, रामचंद्र आडेलकर, लिलाधर मांजरेकर, सौ.पल्लवी धुरी, गंगाधर गोवेकर, बाबा टेमकर, संदिप कांबळी, तसेच मोठ्या संख्येने आडेली ग्रामस्थ, शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आडेली परब कासले वाडी रस्ता कॉंक्रीटीकरण करणे, आडेली खुटवळ वाडी ते सोनसुरकर वाडी रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविणे, सोनसुरकर वाडी येथे संरक्षक भिंत बांधणे, आडेली वजराठ पिंपळाचे भरड रस्ता डांबरीकरण करणे ( सोनसुरकर वाडी ), आडेली जांभरमळा डीपी ते वजराठ जोड रस्ता डांबरीकरण करणे, आडेली वेतोरे कोंडस्कर वाडी जोड रस्त्यावरील पुलाला संरक्षक भिंत बांधणे, आडेली आंबेडकर नगर ते शेर्लेवाडी रस्ता डांबरीकरण करणे, आडेली भंडारवाडी ते गवळीवाडी रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविणे, आडेली पूनाळेकर दुकान ते दत्तमंदिर रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविणे इत्यादी कामांची भूमिपूजन करण्यात आली.

\