विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती अभेद्यच…

2

रवींद्र चव्हाण; साळगावकरांनी विधानसभा लढवावी तो लोकशाहीचा अधिकार…

सावंतवाडी ता.१६: आगामी काळात शिवसेना-भाजपा युती अभेद्य राहील असा विश्वास आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.बबन साळगावकर हे शहराचे नगराध्यक्ष आहेत.त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलावे असा उलट प्रश्न करून लोकशाहीत कोणालाही निवडणूक घडवण्याचा हक्क आहे.त्यामुळे याबाबत आपण काही बोलणार नाही प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले.श्री.चव्हाण हे आज या ठिकाणी आले होते.
या वेळी श्री.चव्हाण म्हणाले आम्ही रेशन पद्धतीवर पारदर्शकता आणली त्यामुळे त्याचा फायदा राज्यातील तब्बल चार हजार गरजवंतांना मिळाला ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या अनेक योजनांचा फायदा लोकांना निश्चितच होईल.नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशाला बाबत विचारले असता याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत.त्यामुळे याबाबत आपण काही बोलणार नाही असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली,अतुल काळसेकर,मनोज नाईक,महेश सारंग आदी उपस्थित होते.

7

4