Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमानचे बैलगाडी आंदोलन...

रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमानचे बैलगाडी आंदोलन…

उद्यापासून काम सुरू न केल्यास रणजित देसाई यांचा रास्ता रोकोचा इशारा…

कुडाळ ता.१६: जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने नेरूरपार ब्रिज ते वसुंधरा विज्ञान केंद्रा पर्यंत बैलगाडीने प्रवास करून आज अनोखे बैलगाडी आंदोलन छेडण्यात आले.दरम्यान उद्यापासून काम सुरु न झाल्यास रास्तारोको करू असा इशारा जिल्हा परिषदचे उपादक्ष रणजित देसाई यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.या रस्त्यांवरून गाड्या चालवणे तर सोडाच परंतु पायी चालत जाणे देखील कठीण झालेले आहे.कुडाळ मालवण रस्त्यावर नेरूर बांदिवडेकर टेंब ते नेरूरपार मार्गे काळसे हुबळी चा माळ पर्यंत या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे.वेगवेगळया यात्रांच्या निमित्ताने याच रस्त्यावरून फिरणारे जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार तसेच स्थानिक आमदार यांना रस्त्याची ही अवस्था दिसत नाही का प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.आणि म्हणूनच या रस्त्याच्या दुरावस्थेकडे संबंधीत विभागाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होण्याकरता आज स्वाभिमानच्या वतीने भर पावसात नेरूरपार ब्रिज ते वसुंधरा विज्ञान केंद्र पर्यंत बैलगाडीने प्रवास करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या बैलगाडी यात्रेत ग्रामस्थ तसेच या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक सहभागी झाले होते.या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पाठिबा दिला.यावेळी मनसे जिल्हादक्ष धीरज परब,कुडाळ तालुका माजी अध्यक्ष बाबल गावडे,उपाध्यक्ष दीपक गावडे,राजा प्रभू,संदेश नाईक तसेच स्वाभिमान कार्यकर्ते उपस्थित होते
श्री देसाई यांनी यावेळी बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर घेतले या रस्त्यावरून बैलगाडी सुद्धा चालू शकत नाही नेरूर-बांदिवडेकर टेम्ब ते होबळीचा माळ रास्ता खड्डेमयअ असून सा.बा.च्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन देण्यात आले उद्यापासून काम सुरु न झाल्यास रास्तारोकोचा इशारासुद्धा देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments