युवासिंधू फाउंडेशन सिंधुदुर्ग तर्फे शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता

2

वेंगुर्ले.ता.१६: युवासिंधू फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम पुर्ण दिवस राबविण्यात आली. किनाऱ्यावर साचलेला कचरा साफ करण्यात आला. जिथे पर्यावरणाची हाक तिथे युवासिंधुची साथ हे ब्रिद वाक्य घेऊन युवासिंधू काम करीत आहे.

गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी पुजलेल्या गणपती बाप्पांचे विसर्जन १२ आॅगस्ट म्हणजेच अनंत चतुर्थीला करण्यात आले. या कालावधीत समुद्र किनाऱ्यांवर फटाक्यांचा, प्लास्टीकचा तसेच अन्य वस्तुंचा मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. समुद्र किनारा स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याने युवासिंधू फाउंडेशनने हि स्वच्छता मोहिम राबविली. या मोहिमेत युवासिंधुचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

11

4