ओसरगाव येथे ज्येष्ठ नागरिकाला लुटले

2

दोघा मोटारसायकलस्वारांकडून प्रकार : दागिने, रोकड लंपास

कणकवली, ता. १६: मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे दोघा
मोटरसायकलस्वारांनी ज्येष्ठ नागरीकाला दोघा मोटारसायकलस्वारांनी लुटले. यात ज्येष्ठ नागरिकाकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख २७ हजार रूपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. शंकर मालोजी राणे (वय ६७ रा. ओसरगाव) असे त्या लुटल्या गेलेल्या ज्येष्ठ नागरीकाचे नाव आहे. उद्या (ता.१७) कणकवलीत मुख्यमंत्री येणार असल्याने महामार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त आहे. तरीही हा प्रकार घडल्याने नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्त झाले.
शंकर राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी आले. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ओसरगाव महिला बचत भवन येथील जिल्हा बँकेच्या शाखेत गेले होते. तेथे पैसे काढून पुन्हा चालत महामार्गाने येत असताना पटेलवाडी येथे एकच्या रेनकोट घातलेला एक मोटरसायकलस्वार त्यांच्याजवळ आला. त्याने आपण पोलिस असल्याची बतावणी केली. त्यानंतर दुसरा मोटारसायकलस्वारही तेथे आला. यातील पहिल्या मोटारसायकलस्वाराने माझ्याकडेही रूमाल मागितला. त्या रूमालात आपल्याकडील दोन अंगठ्या, सोन्याची चैन, मनगटी घड्याळ, पैशाचे पाकीट, डायरी ठेवण्यास
सांगितले आणि रूमाल गुंडाळून माझ्याकडे परत दिला. नंतर शंकर राणे हे तेथून रिक्षात बसून घरी जात असताना आपल्याकडील गुंडाळलेला रूमाल पाहिला तर काहीच सापडले नाही. त्यामुळे आपली लुट झाल्याचे लक्षात आले.
संशयित मोटारसायकल स्वारांनी श्री. राणे यांच्याकडील ४५हजाराची सोन्याची चैन, २८ हजाराची अंगठी, तसेच १४हजार रूपयेची अंगठी आणि रोख ४० हजार रूपये लुटल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी येथील पोलिसात दोघा संशियीतावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
———–

16

4