कोकण पर्यटन विकास समितीसाठी १ हजार कोटींची तरतूदीची मागणी…

2

प्रमोद जठार : मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन;विविध योजना कार्यान्वीत करण्याची मागणी…

कणकवली, ता. १६ : महाराष्ट्राच्या एकुण पर्यटन क्षेत्रापैकी ५० टक्के पर्यटन क्षेत्र हे कोकणातील ७२० किमीच्या समुद्र तटीय परिसरात तसेच निसर्ग संपन्न परिसरात विखुरले
आहे़ त्याचा विकास व पर्यटन वाढीस चालना देण्याकरीता पर्यटन संचलनालयाअंतर्गत कोकण पर्यटन विकास समितीस स्वतंत्र लेखाशिर्ष मंजूर करून १ हजार कोटी रूपये निधीची तरतूद करावी व कोकणातील पर्यटनाला बळ देणाऱ्या पुढील योजनांचा मंजूरी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली़
कणकवली भाजपा जिल्हा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे आहेत़ पहिल्या टप्प्यात कै़ सुषमा स्वराज महिला सबलीकरण न्याहरी व निवास पर्यटन योजनेतून प्रत्येक जिल्ह्यातून १०० पर्यटन गावे निवडण्यात यावीत़ प्रत्येक गावात १० अद्ययावत निवास व्यवस्था करून ५००० पर्यटन निवासांची निर्मिती होईल़ मुंबई बँक व सीएसआर मधून अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करावेत़ त्यातून कोकणात टुरिस्ट सर्कीट निर्माण होऊन ५ हजार महिलांना टुरिस्ट गाईड, जेवण, स्वच्छता, सुरक्षा, लोककला वाहन आदी सेवेतून पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वयंरोजगार मिळणार
असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले़

9

4