पोलीस व्हॅनला अपघात:११ पोलीस कर्मचारी जखमी…

2

कासार्डे येथील घटना:अधिक उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल…

कणकवली.ता,१६: भरधाव जाणाऱ्या कंटेनरने पोलीस व्हॅनला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात व्हॅन चालक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला.तर प्रवास करणारे अन्य दहा कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
हा अपघात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे ब्राम्हणवाडी येथे घडला.अपघातात गाडीचा चालक एमन्नाप्पा वडर यांच्यासह कॉस्टेबल संग्राम दत्तात्रय पाटील (वय-२७), प्रदीप सदाशीव चव्हाण(वय -३०),सुरेश गोबिंद मोहनडुले(२५),अजीत नानासो पाटील (२५),विठ्ठल खरात(२९)वैभव मारुत जाधव(२७),देवेंद्र नारायण मुंबरकर,विक्रम विलास पाटोळे,निखील अरविंद पासलकर आदी जखमी झाले आहेत.त्यांना कणकवली येथील खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

1

4