वेंगुर्लेत निर्माल्यापासून खतनिर्मिती…

2

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम…

वेंगुर्ले ता.१६: डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे वेंगुर्ले येथे गणपती विसर्जनच्या वेळी जमा केलेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचे काम हाती घेतले आहे.आपल्याकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. प्रत्येकजण आपल्या परिने घरात दिड, पाच, सात, अकरा, सतरा दिवस गणपती ठेवून त्याचे विसर्जन करीत असतात. तसेच विसर्जनावेळी निर्माल्यही पाण्यात टाकत असतात. मात्र यावर्षी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे हे निर्माल्य एकत्र करण्यात आले. हे एकत्र केलेल्या निर्माल्यापासून आता कंपोस्ट खत बनविण्यात येत आहे. या कार्यात श्रीसदस्यांनी सहभाग घेतला.

22

4