खासदार विनायक राऊतांच्या निवासस्थानी रंगला “भक्तीचा मेळा”

2

निमित्त चतुर्थीचे: अनेक कलाकारांना भजन फुगड्या सादर करण्याची संधी

मालवण ता १७

चतुर्थीच्या निमित्ताने येथील लोकसभेचे खासदार तथा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांच्या निवासस्थानी गणपतीच्या पंधरा दिवसात तब्बल दोनशेहून अधिक भजने व फुगड्या सादर करण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग रत्नागिरी सह आजूबाजूच्या परिसरातील कलाकारांनी उस्फुर्त भेटी देत आपल्यातले कलाप्रकार सादर केले. विशेष म्हणजे पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत चालणाऱ्या या सर्व भक्तीरसात खुद्द खासदारानी आपण उपस्थित राहून दाद दिली आहे.कलाकार स्वतःहून याठिकाणी आपल्या कला सादर करण्यासाठी येतात हे आमचे भाग्य असा विश्वास श्री राऊत यांनी व्यक्त केला आहे

0

4