मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष स्थानबद्ध

2

कुडाळ ता 17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना पहाटे घरातून पोलिसांनी स्थानबद्ध केले दरम्यान या कारवाईबाबत श्री परब यांनी निषेध केला असून ही सत्ताधाऱ्यांची हिटलरशाही आहे असा आरोप केला आहे आज सकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली यावेळी आपण पण पोलिसांच्या गाडीतून येणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर दोन पोलिसांना समवेत स्वतःच्या गाडीने आपण पोलीस ठाण्यात आलो असे परत म्हणाले मुख्यमंत्री जिल्ह्यातून जाईपर्यंत आपल्याला स्थानबद्ध करण्यात येणार आहे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे मात्र अशा प्रकारे कारवाई करून सत्ताधारी नेमकी काय साधू इच्छितात असा प्रश्न श्री परब यांनी केला आहे

9

4