ल्हाधिकारी डॉ पांढरपट्टे यांचे न्याय देण्याचे आश्वासन
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी यादव यांच्या समवेत पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष धोंड, सर्व सभासद यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या समस्यांना न्याय मिळविण्यासाठी १६ सप्टेंबर २०१९ रोजी भेट घेतली.
राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा मागील १५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांना विशेष बाब म्हणून राज्य शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयीन आस्थापनेवर कंत्राटी तत्वावर नोकरीची संधीमध्ये सुट देऊन वैयक्तिकरित्या प्राधान्याने नेमणूक देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
२ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेसोबत कौशल्य विकास व उद्योजकता खात्याचे मा.राज्यमंत्री यांची दिनांक २०.८.१९ रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या आदेशानुसार सर्व नियुक्ती अधिका-यांना काल्पनिक पदे निर्माण करून त्यासाठी या उमेदवारांच्या कोणतीही परिक्षा न घेता, मुलाखती न घेता थेट नियुक्ती करण्याचे आदेश दिले. परंतू शासन निर्णयानुसार २ मार्च 20१९ नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या विविध खात्यांमध्ये जाहिरात देऊन भरती करण्यात आल्या परंतू या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही ही बाब रावजी यादव यांनी जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून दिली असता ” सर्व प्रथम अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय अशी विचारणा जिल्हाधिकारी यांनी केली असता ती सविस्तर सांगितले नंतर आतां या विषयाबाबत मी सर्व विभागांना चौकशी लावून रिक्त पदांचा आढावा घ्यायला लावून त्यात ‘ काल्पनिक पद ‘ कशी तयार होऊन, समजा 100 पद रिक्त असतील तर त्यात 70 % पद तुमच्यासाठी काल्पनिक पद म्हणून देण्यात येतील, असे सांगितले व आता आचारसंहीतेत आम्ही याबाबत रुपरेखा ठरवून आचारसंहीता झाल्यावर पदे भरण्यात येतील. असे आश्वासित केले.
यावेळी निवेदन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना देण्यात आले. यावेळी काष्ट्राईब कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव तथा भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी गंगाराम यादव, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोविंद धोंड , उपाध्यक्ष संतोष बांदेकर , खजिनदार मनिषा भोपाळकर उर्फ शिरोडकर,लक्ष्मण कोठावळे, अनंत राऊळ , प्रसाद पेडणेकर, सुषमा कांदळगावकर,राधा पुजारे, मनोजकुमार सावंत,दिलीप देसाई,भारतीय मेस्त्री, अनिता सुकी,मलिका शेख,दिप्ती कासवकर, स्मिताली नाईक, अनिल कविटकर, संजय सुद, शहरत शेख आदी उपस्थित होते.