सावंतवाडी-उभाबाजार हनुमान मित्र मंडळाच्या बाप्पाला सहस्र मोदकांचा नैवेद्य…

2

सावंतवाडी ता.१७: येथील उभाबाजार हनुमान मित्र मंडळाच्या वतीने याठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाला आज अंगारकी चतुर्थी निमित्त सहस्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.यावेळी उभा बाजार मित्र मंडळातील महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री.हनुमान मंदिरात २१ दिवसांच्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.बाप्पाच्या दर्शनासाठी याठिकाणी दिवसेंदिवस नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.दरम्यान आज अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांचा भक्तीसागर याठिकाणी लोटला होता.यावेळी येथील महिला मंडळाच्या वतीने बाप्पाला दाखवण्यात आलेला सहस्र मोदकांचा नैवेद्य लक्षवेधी ठरला.यावेळी उपस्थितांनी दर्शनाचा व नैवेद्याचा लाभ घेतला.

19

4