सावंतवाडी-वैश्यवाडा येथील गणपती बाप्पाला ७ हजार ५५३ मोदकांचा नैवेद्य…

2

सावंतवाडी ता.१७: वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पा चरणी आज अंगारकी चतुर्थीनिमित्त तब्बल ७ हजार ५५३ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.दरम्यान सकाळी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते.
येथील वेधशाळेचे मंदार मणेरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेधशाळेच्या विद्यार्थ्यां समवेत अथर्वशीर्ष पठण झाले.यावेळी श्रींच्या पूजेचा मान रत्नाकर शिरसाट यांना मिळाला त्यानंतर दुपारी महाआरती व वैश्यवाडा तसेच परिसरातील भाविकांनी बाप्पा चरणी अर्पण केलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला.यात तब्बल ७ हजार ५५३ एवढी मोदकांची संख्या होती.
गेली अनेक वर्षे वैश्यवाडा येथील २१ दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो.यावेळी रोज रात्री भजन,फुगडी आदी कार्यक्रम होत असतात.यात प्रशांत टोपले,नरेश जीवणे,प्रकाश मिशाळ,ऍड.परीमल नाईक,शरद सुकी,महादेव गावडे,धोंडी दळवी,प्रकाश सुकी,आनंद नेवगी,डॉ.दादा केसरकर तसेच म्हापसेकर बंधू यांचा विशेष सहभाग असतो.

6

4