अर्चना घारे-परब; राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाच्या सदैव पाठीशी…
सावंतवाडी ता.१७: मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत काळे झेंडे दाखवू असा इशारा देणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांवर सरकार जर दडपशाही करत असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी पक्ष निरीक्षिका अर्चना घारे-परब यांनी आज येथे लगावला याबाबतचे प्रसिद्धीपत्रक त्यांनी दिले आहे.
सौ.घारे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे,मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळे शेंडे दाखवू असा इशारा देणारे मराठा समाजाचे नेते तथा मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांना आज सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते.दरम्यान काही मराठा समाजातील इतर नेत्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे।त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे सरकारची दडपशाही आहे.असा आरोप त्यांनी केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ४०० मुलांची सरकरने फसवणूक केली आहे.याबाबत चर्चेला वेळ सुद्धा दिला नाही.यामुळे श्री.फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मराठा समाजातील युवा नेत्यांनी दिला होता.या नेत्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन सरकार दडपशाहीचे राजकारण करत आहे.ही दडपशाही करून मुख्यमंत्री इंग्रजांच्या राजवटीची आठवण करून देत आहे.गृहमंत्री पदाच्या अधिकारांचा गैरवापर करत आहे.
भाजपबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.लोकांचा हा रोष दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.गड किल्ले भाड्यानं देऊ नका असं सांगणाऱ्याना अटक करण्यात येत आहे.या कृत्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करत आहोत असे त्या म्हणाल्या.
. “उतणार नाही, मातणार नाही” अशी भाषा करणाऱ्या सरकारचं असं वागण योग्य नाही.मराठा नेत्यांवर दडपशाही करणाऱ्या सरकारला आता जनताचं जागा दाखवेल.मराठा समाज व नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुर्णपणे पाठीशी आहे.